संस्था कार्य

कार्याच्या दृष्टीने संस्थेया विकासाचे साधारणपणे पंधरा पंधरा वर्षाचे टप्पे आहेत.

पहिला टप्पा १९५७ ते १९७२

प्रारंभी जागेअभावी सभासदांच्या घरी एकत्र येत. सामुदायिक मौंजी, श्रावणी असे कार्यक्रम केले जात. त्यानंतर ज्ञातीबंधावांसाठी शालांत परीक्षेतील गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यास सुरवात झाली. १९७२ साली संस्थेची घटना तयार करण्यात आली आणि ती रीतसर धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत करण्यात आली.

दुसरा टप्पा १९७२-१९८५

या टप्प्यात संस्थेचे कार्य पाहून तसेच कार्यकर्त्यांची तळमळ पाहून, आग्रा रोड वरील दातार ब्लॉक्सचे मालक मोटे वकील यांनी दातार जवळील बखल जागा संस्थेच्या वस्तूसाठी नाममात्र भाड्याने दिली. समाजोपयोगी उपक्रम राबवता यावे यासाठी स्वतःची वस्तू व्हावी यासाठी संस्थेने आपल्या घटनेत बदल करून घेतले. संस्थेचे तीन आजीव विश्वस्त नियुक्त करण्यात आले. त्यात श्री. पांडुरंग सदाशिव उपासनी, श्री. विठ्ठल महादेव पांडे आणि श्री कुलकर्णी वकिल यांचा समावेश करण्यात आला. श्री. उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेने इमारत निधी समिती स्थापन करून, संस्थेच्या वस्तूचा आराखडा वास्तुविशारद जयंत सुभेदार यांचेकडून तयार करून घेतला, नगर परिषदेकडून मंजूर करून घेतला गेला. संस्थेची वस्तू तयार व्हावी यासाठी निधी/देणग्या गोळा करायला सुरवात केली. दरम्यान त्याकाळात ज्ञाती बांधवांची संख्या लक्ष्यात घेता निधी संकलनावर मर्यादा आल्या. त्याच दरम्यान विश्वस्त कुलकर्णी वकील यांचे निधन झाले. यानंतर तिसरे विश्वस्त म्हणून कल्याणात नावलौकिक असलेले डॉक्टर व धर्मार्थ डोळ्यांच्या दवाखाना, सुभेदार वाडा आदि संस्थांशी संबधित डॉक्टर एकलहरे यांची तिसरे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. एका बाजूला संस्थेत नवीन कार्यकर्ते व सभासद सहभागी होत असतांना संस्थेच्या वास्तूबाबत कोणतीही प्रगती होत नव्हती.

तिसरा टप्पा १९८६-२००१

श्री बाळ पांडे, ल.बा. डांगे, श्री राजीव जोशी, श्री सुभाष काळे, श्री वसंतराव कुलकर्णी आदी तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे या काळात डॉक्टर एकलहरे विश्वस्तपदी कार्यरत झाले. त्यानंतर, संस्थेच्या प्लॉटवर होणारी आक्रमणं तसेच बांधकाम आराखड्याची मुदत आदी लक्षात घेता संस्थेच्या वास्तू बांधणीचा विचार जोराने पुढे आला. इमारत निधी समितीची पुनर्रचना करण्यात आली. संस्थेच्या ध्येय आणि धोरणाला समाजाभिमुख करण्यात आले. निधी जमा करण्यास मदत व्हावी यासाठी विश्वस्त मंडळाचा विस्तार करून कल्याणातील नामवंत मंडळींचा समावेश करण्यात आला. त्यात कल्याणचे तत्कालीन आमदार प्रा. राम कापसे, बिर्ला कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.चंद्रकांत चावरे तसेच महाराष्ट्र टेलरिंगचे श्रीपादराव सराफ, डॉक्टर दीपक वैद्य आदींचा समावेश करण्यात आला.
तरुण कार्यकर्त्यांना घेवून दर शनिवार व रविवारी डॉक्टर एकलहरे यांनी निधी संकलन मोहीम हाती घेतली. निधीचा विचार न करता बांधकाम व्यावसायिक माधव केळकर यांनी वास्तूचे बांधकाम हाती घेतलं व विहित मुदतीत पूर्ण केलं. कल्याण जनता सहकारी बँकेने वस्तूचा पहिला मजला भाड्याने घेवून काला तलाव ब्रांच सुरु केली व संस्थेस सहकार्य केला. १९८९ मध्ये वस्तूचे लोकार्पण मुंबईचे माजी महापौर श्री. शरद आचार्य यांचे हस्ते करण्यात आले.

चौथा टप्पा २००१ ते २०१७

या कालावधीत संस्थेने समाजाभिमुख होण्यासाठी अनेक कार्यक्रम केलेत. हेमालकसा येथील कार्य बद्दल डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाताई आमटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला व उभयतांना १४ लाखांची थैली अर्पण करण्यात आली. संस्थेने खैरे आंबिवली या आदिवासी गावातल्या शाळेत मुलांसाठी शाळा दुरुस्ती तसेच मुलांसाठी अभ्यासाला सौर दिवे दिलेत.

पाचवा टप्पा २०१७ पासून

श्री राधाकृष्ण पाठक यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत नवीन कार्यकर्त्यांची टीम कार्यरत झाली आहे. बदलत्या काळाची आव्हानं लक्षात घेवून संस्थेत श्री. मिलिंद कुलकर्णी तसेच श्री. राजीव जोशी या दोन नविन विश्वस्तांचा समावेश करण्यात आला.